कोल्हापूर :
जागतिक सायकल दिवस आणि पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि माय भारत कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोल्हापूर शहरात एका भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये शहरातील ३०० हून अधिक पर्यावरणप्रेमी, सायकलस्वार आणि खेळाडूंनी उत्साहात सहभाग नोंदवला.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि स्थानिक सायकल क्लबच्या सदस्यांनीही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
रॅली दरम्यान मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपस्थितांना निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात सायकल चालवण्याचे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे जाहीर आवाहन केले. वाढत्या प्रदूषणामुळे सायकलचे महत्त्व अधिक वाढल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या आणि निसर्ग संवर्धनासाठी एकत्र आलेल्या सर्व पर्यावरणप्रेमी, खेळाडू व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
या सायकल रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना झाडाचे रोप देऊन पर्यावरणपूरक स्वागत केले. यानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची अधिकृत सुरुवात केली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद माने, कोल्हापूर जिल्हा सायकल असोसिएशनचे कपिल कोळी, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मण पवार, सुधाकर जमादार व मनीषा पाटील, क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी, राज्य क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील व अनिकेत बोडके, रवी कुमठेकर आणि सहाय्यक विकास अधिकारी अजिंक्य चौगुले, संदीप जाधव, गौरव खामकर आदी उपस्थित होते. तसेच खेल इंडिया सेंटरमधील सर्व खेळाडू, मार्गदर्शक मानतेस पाटील, महाराष्ट्र हायस्कूलमधील खेळाडू व क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे सहभागी होते. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन अमित शिंत्रे आणि शिवाजी पाटील यांनी केले.
——————————
• जागतिक सायकल व पर्यावरण दिनानिमित्त ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’चा नारा
Mumbai
overcast clouds
27.8
°
C
27.8
°
27.8
°
81 %
7.8kmh
94 %
Sun
28
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

