Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंदमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा

विवेकानंदमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा

कोल्हापूर :
बदलती जीवनशैली जागतिकीकरण वाढणारे उद्योगधंदे, प्रसरण पावणारे नागरिकरण यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. निसर्गाच्या ऱ्हासामुळे हवामान बदल आणि सजीव जीवनसाथी धोक्यात येत आहे. त्याचे संरक्षण करण्याकरिता वृक्षारोपणासोबत वृक्ष संगोपन हे सक्षमतेने करावे, असे मत कर्नल विक्रम नलवडे यांनी विवेकानंद महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण प्रसंगी मांडले.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम महाविद्यालयात एनसीसी, एनएसएस या विभागामार्फत राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, प्रा. नरेवाडीकर, डॉ.पी. आर. बागडी यांनी केले.
याप्रसंगी प्रा. डॉ. अर्जुन कुंभार, डॉ. जी. जे. नवाथे, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि एन.सी.सी. छात्र उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page