कोल्हापूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत तसेच ‘एक कदम स्वच्छता की ओर’ या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. रंकाळा परिसरातील राजकपूर पुतळ्यासमोरील छत्रपती शाहू उद्यान येथे वृक्षारोपण करून या अभियानास प्रारंभ करण्यात आला यावेळी ५० वृक्षांची लागवड करण्यात आली.
त्यानंतर छत्रपती शाहू उद्यान, तांबट कमान, संध्यामठ परिसर तसेच रंकाळा टॉवर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिसरातील कचरा संकलित करून नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उद्यानात नियमित फिरायला येणाऱ्या नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. याप्रसंगी महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विराज चिखलीकर, राजेश कोगनुळकर, अमर साठे, हेमंत आराध्ये यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, विशाल शिराळे, आप्पा लाड, नगरसेवक विजय उर्फ रिंकू देसाई, बबन मोकाशी, अजित ठाणेकर, अर्चना कोराणे, ॲड. पूर्वा राणे, दीपा ठाणेकर, निलांबरी साळोखे, माधुरी नकाते, कोमल देसाई, प्रकाश सरनाईक, प्राची कुलकर्णी, रश्मी साळोखे, किरण नकाते, सुधीर देसाई, संग्रामसिंह जरग, महेश यादव, भरत काळे, दिलीप मैत्राणी, सयाजी आळवेकर, प्रशांत मोरे, अनिल कामत, गिरीश साळोखे, मनोज कदम, सुहास सदलगे, दिग्विजय कालेकर, सुधीर बोळावे, विश्वजीत पवार, विनय खोपडे, विवेक कोरडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान
Mumbai
clear sky
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
6 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

