• पाच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना जागतिक दर्जाची मान्यता
• विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी
कोल्हापूर :
कसबा बावडा परिसरातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळाचे (एनबीए) प्रतिष्ठेचे टीअर-१ (वॉशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकन प्राप्त झाले आहे. ही माहिती डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी हॉटेल सयाजी येथे आयोजित विशेष समारंभात दिली.
यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र-कुलपती व संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त सौ. पूजा ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक व डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, एन. बी. ए. समन्वयक डॉ. गणेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पाच अभ्यासक्रमांना हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. शैक्षणिक गुणवत्ता, परिणामाधारित शिक्षण, संशोधन, उद्योग- संलग्नता, प्रयोगशाळा सुविधा तसेच विद्यार्थ्यांची प्रगती यांचे सखोल मूल्यमापन केल्यानंतर हे मानांकन देण्यात आले आहे.
यावेळी बोलताना डॉ. संजय पाटील म्हणाले की, हे मानांकन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मिळालेली जागतिक दर्जाची गुणवत्ता-पावती आहे. भविष्यातही जागतिक दर्जाचे अभियंते घडविण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील. संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.
ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, या मानांकनामुळे विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण, संशोधन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. उद्योग, संशोधन आणि नवोपक्रम यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.
कार्यकारी संचालक तथा कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले की, भारत हा वॉशिंग्टन ॲकॉर्डचा सदस्य देश असल्याने या मानांकनप्राप्त अभ्यासक्रमांना २६ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षण, जागतिक रोजगार संधी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी मोठा लाभ होईल. तसेच या मानांकनामुळे महाविद्यालयाचा समावेश महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील मोजक्या दर्जेदार संस्थांमध्ये झाला आहे.
प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी हे यश संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता, परिणामाधारित शिक्षण पद्धती आणि सातत्यपूर्ण प्रगतीवरील राष्ट्रीय विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. गणेश पाटील, सिव्हील विभागप्रमुख किरण माने, केमिकल विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव, कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख डॉ. राधिका ढणाल, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. टी. बी. मोहिते पाटील, पॉलीटेक्नीकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शिंदे आणि प्रा. मधुगंधा मिठारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एल. व्ही. मालदे यांनी केले. यावेळी विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.
—————————— ————————-

——————————