Homeराजकियभारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटनात्मक बैठक उत्साहात

भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटनात्मक बैठक उत्साहात

कोल्हापूर :
भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक गुरुवारी भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. भारतीय जनता पार्टी पूर्व, पश्चिम आणि महानगरचे जिल्हा पदाधिकारी, मंडल  अध्यक्ष, आघाडी मोर्चा अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये बैठकीचा उद्देश समजून सांगितला.
प्रारंभी प्रदेश सहसंयोजक आमदार विक्रम पाचपुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करताना, आगामी सर्व कार्यक्रम केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीतून आणि जनसंपर्कातून प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त केली.
विभाग संयोजक विक्रम पावसकर यांनी संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला. ९ जून रोजी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात होणाऱ्या बैठकीसाठी जिल्हानिहाय सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आगामी काळात ‘सरल ॲप’च्या माध्यमातून सर्व बैठका व कार्यक्रमांचे रिपोर्टिंग केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विभाग संयोजक विक्रम देशमुख यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ नोंदणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शरद लाड यांनीही पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी व्यापक नोंदणी मोहीम राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विभाग समन्वयक आमदार निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम, पदवीधर नोंदणी अभियान तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त होणारे विविध उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.
यावेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ‘मन की बात’ कार्यक्रम १०० टक्के बूथवर आयोजित करण्यात आल्याबद्दल दक्षिण विधानसभा क्षेत्रातील मंडलाध्यक्षांचा हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बाचल यांनी केले. माजी प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी आमदार विक्रम पाचपुते, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, पृथ्वीराज पाटील, रामकृष्ण वेताळ, योगेश बाचल, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निबाळकर, तानाजी पाटील, विशाल शिराळे, मुरलीधर जाधव, अंबरिश घाटगे, यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31 ° C
31 °
29.9 °
66 %
3.1kmh
12 %
Wed
30 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page