Homeशैक्षणिक - उद्योग यशश्री भोसलेची भारतीय सैन्यदलाच्या सेना पोलीस विभागात निवड

यशश्री भोसलेची भारतीय सैन्यदलाच्या सेना पोलीस विभागात निवड

कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजमधील बी.सी.ए. भाग एक मधील विद्यार्थिनी आणि पाच महाराष्ट्र एनसीसी बटालियनची छात्रा ज्युनिअर अंडर ऑफिसर यशश्री भोसले यांची निवड भारतीय संरक्षण दलांतर्गत भारतीय सैन्य दलाच्या सेना पोलीस विभागात झाली आहे.
या निवडीसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित, सेना मेडल लेफ्टनंट कर्नल आशुतोष पाटील, बी.सी.ए. विभागातील प्रा. व्ही. बी. पुजारी, प्रशासन अधिकारी लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, मेजर सुनिता भोसले व केअरटेकर प्राध्यापिका एन. ए. नरेवाडीकर, कार्यालयीन प्रबंधक सचिन धनवडे, सुभेदार मेजर भोसले, बटालियन स्टाफ आणि पालक यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
83 %
9.1kmh
93 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page