Homeकला - क्रीडामहाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या सहसचिवपदी संजय तोरस्कर यांची फेरनिवड

महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या सहसचिवपदी संजय तोरस्कर यांची फेरनिवड

कोल्हापूर :
महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा व निवडणूक नुकतीच मुंबईतील भारतीय क्रीडा मंदिर येथे पार पडली. या निवडणुकीत सन २०२६ ते २०३० या कालावधीसाठी कोल्हापूरचे संजय तोरस्कर यांची सहसचिवपदी फेरनिवड करण्यात आली.
संजय तोरस्कर यांना केएसएचे पेट्रन-इन-चीफ् शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे छत्रपती, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक,
जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. के. जी. जाधव,
नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गौतम पाटील (सांगली), प्रा. विजय रोकडे, सुधाकर डाफळे आणि विश्वास चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा संजय शेटे (महासचिव महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन) यांची तर सचिवपदी मकरंद जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
• वरिष्ठ उपाध्यक्ष : मनोज कोटक (मुंबई), तन्वी शेटे (मुंबई शहर)
• उपाध्यक्ष : उत्तम लटपटे (परभणी), इंद्रजीतसिंग राठोड (मुंबई उपनगर), माधुरी चेंडके (अमरावती)
• कोषाध्यक्ष : सविता मराठे (पुणे)
• सहसचिव : दीपक सावंत (सांगली), पुरुषोत्तम दारव्हाणकर (नागपूर), संजय तोरस्कर (कोल्हापूर), राकेश केदारे (नाशिक)
• कार्यकारिणी सदस्य : प्रवीण पाटील (जळगाव), संजय मंगोडेकर (पिंपरी-चिंचवड), मयुरेश एकबोटे (पुणे), हर्षल मोगरे (छत्रपती संभाजीनगर), दुर्गराज रामटेके (चंद्रपूर).
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31 ° C
31 °
29.9 °
66 %
3.1kmh
12 %
Wed
30 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page