कोल्हापूर :
हलगी-घुमकं आणि कैताळच्या कडकडाटात, बाराबंदी पोशाखातील मावळे तसेच आंबिल, घुगऱ्या, भाकरी-वडीचा नैवेद्य घेऊन आलेल्या युवतींच्या उपस्थितीत दुर्गराज रायगडावरील महादरवाजाला बांधण्यात येणाऱ्या सुवर्णालंकारित तोरणाचे मंगळवारी पूजन करण्यात आले. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते हा विधी पार पडला.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ५ व ६ जून रोजी रायगडावर ३५२वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त महादरवाजाला तोरण बांधण्याचा मान कोल्हापूरच्या सह्याद्री प्रतिष्ठानला मिळाला आहे. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले सुमारे १२ फूट लांबीचे हे तोरण भवानी मंडपातून तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणण्यात आले. प्रतिष्ठानच्या युवतींनी आंबिल, घुगऱ्या, भाकरी-वडीचा नैवेद्य सादर केला. बाराबंदी पोशाखातील राजेंद्र काटकर, योगेश वेटाळे, शुभम कोळी, केतन कांबळे, राजवर्धन आडनाईक आणि पार्थ माजगावकर यांनी तोरण वाहून नेले. तर साक्षी राऊत, राजनंदिनी पाटील, शर्वरी वडर, प्राची जाधव, इंद्राक्षी भोसले, जान्हवी बोडके, साक्षी पाटील, रेणू माळी, शौर्या थोरवत आणि वैभवी आळवेकर या युवती मराठमोळ्या वेशभूषेत डोक्यावर घागरी घेऊन सहभागी झाल्या होत्या.
यावेळी मूर्तीकार अशोक सुतार, फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, प्रवीण हुबाळे, प्रसन्न मोहिते, उदय घोरपडे, धनाजी खोत, प्रदीप थोरवत, अमर पाटील यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णालंकारित तोरणाचे पूजन
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31
°
C
31
°
29.9
°
66 %
3.1kmh
12 %
Wed
30
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

