Homeसामाजिकविवेकानंद कॉलेजमध्ये तंबाखू मुक्ती दिन साजरा

विवेकानंद कॉलेजमध्ये तंबाखू मुक्ती दिन साजरा

कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजमधील एनसीसी विभागामार्फत तंबाखू मुक्ती दिन जनजागृतीपर रॅलीमधून साजरा करण्यात आला. विवेकानंद कॉलेज ते धैर्यप्रसाद हॉलपर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी रस्त्याकडे असणाऱ्या छोट्या विक्रेत्यांसोबत तंबाखू विरोधी जनजागृतीसाठी शपथ घेण्यात आली.
जागतिक पातळीवर आणि भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने लाखो लोकांचा मृत्यू दरवर्षी होतो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामधून निकोटीनेट सारख्या घातक रसायनांचा प्रभाव मानवी आरोग्यावर होतो. परिणाम कॅन्सरसारख्या दुर्धर आणि गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मानवी वैयक्तिक आरोग्यासोबत कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्य ही धोक्यात येते. यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेकडून ३१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
विवेकानंद कॉलेजमधील एनसीसी विभागामार्फत हा दिन साजरा करण्यात आला. या रॅलीकरिता प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, सीईओ कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, ०५ महाराष्ट्र एनसीसी बटालियन कोल्हापूर कर्नल मानस दीक्षित, ०६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी कोल्हापूर कर्नल विक्रम नलवडे, रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले. रॅलीचे आयोजन एनसीसी प्रमुख लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, केअरटेकर प्रा. डॉ. नम्रता नरेवाडीकर आणि एनसीसी छात्रांनी केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29 ° C
29 °
28.9 °
74 %
3.6kmh
2 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page