Homeशैक्षणिक - उद्योग पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

कोल्हापूर :
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात इयत्ता १ली ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकरी परंपरा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, सांस्कृतिक जाणीव आणि भारतीय परंपरेबद्दल अभिमान निर्माण होण्यास निश्चितच हातभार लागला.
इयत्ता १ली व २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी, संत आणि पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता ३री ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी हाऊसनिहाय लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. विविध लोकनृत्यांच्या प्रभावी सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकसंस्कृती, भक्तीपरंपरा आणि सांस्कृतिक वैभव यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
याचबरोबर पालक व आजी-आजोबांसाठी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमादरम्यान आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विशद करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्याध्यापिका मनीषा आंब्राळे यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page