कोल्हापूर :
शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंच्या (वेट्रन फुटबॉल) स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, शिवाजी तरुण मंडळ आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ या चार संघांनी उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. शनिवारी (दि.२३) उपांत्य फेरीतील सामने तर रविवारी (दि.२४) अंतिम सामना होणार आहे.
शनिवारी सकाळी ७ वाजता संध्यामठ विरुद्ध शिवाजी हा सामना होईल तर पाटाकडील विरुद्ध उत्तरेश्वर हा सामना सकाळी ८ वाजता होईल.
छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे गुरुवारी (दि.२१) झालेल्या सामन्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात संध्यामठ आणि उत्तरेश्वर हा सामना झाला. पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत संपला. संध्यामठकडून गिरीष शहा, योगेश सरनाईक, नंदकुमार जांभळे, अमोल सरनाईक आणि श्रीकांत आरेकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. उत्तरेश्वरकडून दशरथ सुतार, इंद्रनील पाटील, संतोष सुतार आणि बाजीराव काटकर यांनी चमकदार कामगिरी केली.
दुपारच्या सत्रात झालेला दिलबहार आणि शिवाजी यांच्यातील सामना देखील गोलशून्य बरोबरीत राहिला. दिलबहारकडून सचिन पाटील, अभिजीत शिंदे, सोमनाथ लांबोरे आणि रिची फर्नांडिस यांनी प्रभावी खेळ केला. ‘शिवाजी’कडून संदीप साठे, संग्राम शिंदे, जयदीप पाटील आणि संतोष तावडे यांनी उत्कृष्ट समन्वय साधला.
पाटाकडील आणि प्रॅक्टीस हा सामना पूर्णवेळेत गोलशून्य बरोबरीत सुटला. पाटाकडीलकडून अभिजीत चिले, नितीन पाटील, सैफ हकीम आणि गजानन कुराडे यांनी उल्लेखनीय खेळ केला. प्रॅक्टीसकडून गणेश देसाई, दीपक कातवरे, विराज मोहिते आणि रोहन खिरुगडे यांनीही उत्कृष्ट खेळ केला.
——————————
पाटाकडील, संध्यामठ, शिवाजी आणि उत्तरेश्वर उपांत्य फेरीत
RELATED ARTICLES
Mumbai
haze
31
°
C
31
°
31
°
74 %
3.6kmh
20 %
Thu
30
°
Fri
30
°
Sat
30
°
Sun
30
°
Mon
31
°

