कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. राजनीश कमलाकर कामत यांची निवड गुरुवारी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी ही घोषणा केली. आदेशाची प्रत गुरुवारी सायंकाळी विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाली.
डॉ. राजनीश कामत हे शिवाजी विद्यापीठाचे १४ वे कुलगुरु ठरले आहेत. डॉ. दिगंबर शिर्के यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकाकडेच कुलगुरू पदाचा पदभार आलेला आहे. डॉ. राजनीश कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. सध्या ते मुंबई येथील डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.
——————————
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. राजनीश कामत
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28
°
C
28
°
28
°
82 %
13.4kmh
100 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°

