• ओआरएफच्या संयुक्त अभ्यासातून दहा वर्षांत सुधारणा झाल्याचा दावा
कोल्हापूर :
रिलायन्स फाऊंडेशन आणि Observer Research Foundation (ओआरएफ) यांनी ग्रामीण विकास क्षेत्रातील गेल्या दहा वर्षांच्या कार्याचा व्यापक अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासामध्ये देशातील चार राज्यांतील तीन हजार गावांमध्ये झालेल्या बदलांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
अभ्यासानुसार, मजबूत स्थानिक संस्था, लोकसहभाग आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून गावांमधील उपजीविका आणि जीवनमानात सकारात्मक सुधारणा झाली आहे. हा अभ्यास ओडिशातील बलांगीर, मध्य प्रदेशातील मंडला, आंध्र प्रदेशातील आदोनी आणि गुजरातमधील राधनपूर या भागांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांवर आधारित आहे. यामध्ये २,१०० हून अधिक कुटुंबांच्या जीवनात झालेल्या बदलांचा सखोल आढावा घेण्यात आला.
नवी दिल्ली येथे आयोजित चर्चासत्रात धोरण तज्ज्ञ, संशोधक आणि विकास क्षेत्राशी संबंधित मान्यवरांनी आत्मनिर्भर गावांच्या निर्मितीवर विचारमंथन केले.
ओआरएफचे उपाध्यक्ष डॉ. निलांजन घोष यांनी ग्रामीण विकासासाठी स्थानिक गरजांनुसार काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर रिलायन्स फाऊंडेशनचे मुख्य विकास अधिकारी सुदर्शन सुची यांनी गावांतील लोकांनी एकत्र येऊन उपाययोजना तयार केल्यास आणि स्थानिक संस्था सक्षम झाल्यासच गाव आत्मनिर्भर बनतात, असे मत व्यक्त केले.
रिलायन्स फाऊंडेशनच्या ग्रामीण परिवर्तन कार्यक्रमाचे प्रमुख अभिनव सेन यांनी आकडेवारी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लोकसहभागाच्या मदतीने ग्रामपंचायती अधिक सक्षम करता येऊ शकतात, असे सांगितले.
या चर्चेत महिला आणि युवकांचा सहभाग वाढविणे, पर्यावरण संवर्धन तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर यावरही विशेष भर देण्यात आला.
रिलायन्स फाऊंडेशनने सांगितले की, संस्था शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून आतापर्यंत देशभरातील ९.७ कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे.
——————————
रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रयत्नांतून ३ हजार गावांच्या जीवनमानात लक्षणीय बदल
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28
°
C
28
°
28
°
83 %
1.5kmh
16 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°

