कोल्हापूर :
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र योगासन, कोल्हापूरचा खेळाडू रोहित चव्हाण याची ४ ते ८ जून २०२६ दरम्यान ट्रांस स्टडिया स्टेडीयम, अहमदाबाद, गुजरात येथे होणाऱ्या पहिल्या जागतिक योगासन स्पोर्टस चॅम्पियन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली.
रोहित चव्हाणने दि.२९ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ दरम्यान संगमनेर येथे झालेल्या ६ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत वरिष्ठ गटात सुपाईन या प्रकारामध्ये सुवर्ण पदक संपादन केले होते. या कामगिरीच्या जोरावर दि. १ ते ३ मे २०२६ दरम्यान सोनीपत, हरीयाणा येथे होणाऱ्या निवड चाचणीकरीता निवड झाली होती. संपूर्ण भारतातून या निवड चाचणीसाठी एशियन व राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंमधून रोहितची निवड जागतिक स्पर्धेसाठी झाली. तसेच तो कोल्हापूर जिल्ह्यातून अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी वरिष्ठ गटामध्ये निवड होणारा पहिलाच खेळाडू ठरला. जागतिक स्पर्धेचे सराव शिबीर दि. ९ मे २०२६ ते २ जून २०२६ साई सेंटर अहमदाबाद येथे होणार आहे.
रोहित हा राज्य क्रीडा मार्गदर्शक, योगासन रविभुषण कुमठेकर यांचे मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून रोहितवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी अभिनंदन करून जागतिक योगासन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————
रोहित चव्हाण याची जागतिक योगासन स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28.2
°
C
28.2
°
28.2
°
81 %
9.9kmh
21 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
29
°

