Homeकला - क्रीडावेताळमाळचा सम्राटनगरवर एकतर्फी विजय

वेताळमाळचा सम्राटनगरवर एकतर्फी विजय

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीम मंडळने सम्राटनगर स्पोर्ट्सवर ४-० असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मंगळवारी (दि.१२) शिवाजी तरुण मंडळ विरूध्द उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ हा सामना दुपारी चार वाजता होईल.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत एकतर्फी वर्चस्व राखले. पूर्वार्धात संदेश कासारने २४ व्या मिनिटाला तीन-चार खेळाडूंना चकवा देत गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी सम्राटनगरच्या खेळाडूंचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
उत्तरार्धात वेताळमाळच्या खेळाडूंनी अधिक वेगवान खेळ करत सम्राटनगरच्या बचावफळीवर सतत दबाव ठेवला. शोएब बागवानने ४२ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. त्यानंतर सर्वेश वाडकरने दिलेल्या अचूक पासवर आकाश माळीने ४७ व्या मिनिटाला गोल नोंदवला. अवघ्या तीन मिनिटांनी सर्वेश वाडकरने स्वतः गोल करत संघाची आघाडी ४-० अशी भक्कम केली.
वेताळमाळकडून सर्वेश वाडकर, आकाश माळी, संदेश कासार, राहुल पाटील आणि योक्षिम अवुंगशी यांनी वेगवान चढाया करत प्रभावी खेळ केला. सम्राटनगरचा गोलरक्षक ओमकार माने याने वेताळमाळच्या काही चढाया परतावून लावल्या.
सम्राटनगर स्पोर्ट्सकडून अभिषेक सिंग, निरंजन कामते, यासिन नदाफ, कार्तिक जाधव, असिल बागवान, आदित्य जाधव आणि मोहित घोरपडे यांनी प्रयत्न केले. मात्र समन्वयाचा अभाव आणि दिशाहीन फटक्यांमुळे त्यांना अखेरपर्यंत एकही गोल करता आला नाही. अखेर पूर्णवेळेत ४-० गोलची आघाडी राखत वेताळमाळने सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
16 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page