कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आणि संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना पूर्णवेळेत १-१ असा बरोबरीत राहिला. त्यामध्ये उत्तरेश्वरने टायब्रेकरमध्ये ३ विरूध्द २ गोलफरकाने विजय मिळवला. तसेच खंडोबा तालीम मंडळने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळवर २-० गोलने विजय मिळवला. रविवारी (दि.१०) दुपारी चार वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरूध्द प्रॅक्टीस फुटबॉल क्लब हा सामना होईल.
दरम्यान, उत्तरेश्वर आणि जुना बुधवार या सामन्यातील टायब्रेकर सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत सामना पाहण्यासाठी आलेल्या समर्थकांत वादावादी झाल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत शुक्रवारी दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात उत्तरेश्वर आणि जुना बुधवार पेठ यांच्यात चुरशीची लढत झाली. सामन्याच्या पूर्वार्धात दुसऱ्याच मिनिटाला प्रसाद सरनाईकने दिलेल्या अचूक पासवर संकेत जाधवने गोल नोंदवत जुना बुधवार संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरेश्वरकडून इलेन्स शर्माने ४३व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत परस्परांच्या गोलक्षेत्रावर अनेक चढाया केल्या, मात्र कोणालाही गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला व निकाल टायब्रेकरवर लागला.
टायब्रेकरमध्ये उत्तरेश्वरकडून अक्षय शिंदे, तुषार पुनाळकर आणि प्रतिक कांबळे यांनी अचूक गोल केले, तर साकिब मणियार आणि श्रीकांत माने गोल करण्यात अपयशी ठरले. जुना बुधवारकडून साहिल निंबाळकर आणि प्रथमेश जाधव यांनी गोल केले. मात्र शुभम जाधव, सुशील सावंत आणि प्रसाद सरनाईक यांचे फटके गोलपोस्टच्या बाहेर गेल्याने उत्तरेश्वरने ३-२ अशा गोलफरकाने विजय मिळवला.
दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया केल्या पण त्या व्यर्थ ठरल्या. दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धात ४४व्या मिनिटाला आदित्य लायकरने दिलेल्या पासवर ऋतुराज संकपाळने गोल नोंदवत खंडोबा संघाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जादावेळेत ८२व्या मिनिटाला विनायक पाटीलने आणखी एक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
फुलेवाडी संघाकडून अक्षय पाटील, दिग्विजय सुतार, विराज पाटील, हर्षल चौगुले आणि मारुती कोळी यांनी उत्कृष्ट खेळ केला, मात्र त्यांना गोल करता आला नाही. खंडोबाकडून विष्णू मणिकंदम, रोहित जाधव, प्रभू पोवार, प्रथमेश गावडे आणि पृथ्वीराज साळोखे यांच्या चढाया देखील अखेरीस निष्फळ ठरल्या. अखेर खंडोबा तालीम मंडळाने २-० अशी आघाडी कायम राखत विजय मिळवला.
उत्तरेश्वर आणि खंडोबा विजयी
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
26.7
°
C
26.7
°
26.7
°
83 %
6.5kmh
100 %
Tue
27
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
30
°
Sat
30
°

