Homeशैक्षणिक - उद्योग प्रो. डॉ. शिवाजी कांबळे यांची प्रोफेसरपदी निवड

प्रो. डॉ. शिवाजी कांबळे यांची प्रोफेसरपदी निवड

कोल्हापूर :
किसन वीर महाविद्यालय, वाई येथील ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. शिवाजी पांडुरंग कांबळे यांची शिवाजी विद्यापीठाच्या ‘करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीम’ (सीएएस) अंतर्गत प्रोफेसर या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च व प्रतिष्ठित पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. यापूर्वी ते सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
प्रोफेसर पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निकषांनुसार शिवाजी विद्यापीठाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून सखोल मूल्यमापन केले जाते. या प्रक्रियेत संशोधन कार्य, शैक्षणिक योगदान, प्रकाशित शोधनिबंध आणि विविध निकषांची पूर्तता यांचा विचार केला जातो. संबंधित समितीच्या अहवाल व शिफारशीच्या आधारेच ही पदोन्नती जाहीर करण्यात येते.
प्रो. डॉ. कांबळे गेली १७ वर्षे किसन वीर महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असून त्यांनी ग्रंथालय व्यवस्थापन क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले आहे. सध्या ते महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे प्रमुख समन्वयक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित जर्नल्समध्ये २० हून अधिक संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित केले असून संशोधन क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील ग्रंथालयांना त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. विशेषतः ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविणे आणि ग्रंथालयांचा प्रसार करणे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
प्रो. डॉ. शिवाजी कांबळे यांच्या या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायणराव चौधरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक, तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
31 ° C
31 °
31 °
60 %
5.8kmh
38 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
30 °
Sun
30 °

Most Popular

You cannot copy content of this page