कोल्हापूर :
महाराष्ट्राच्या अर्जुन सिंग व आदित्य सिंग या जोडीने नेपल्स, फ्लोरिडा येथे पार पडलेल्या युएस ओपन पिकलबॉल स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करताना ऐतिहासिक कामगिरी बजावली. महाराष्ट्र पिकल बॉल संघटना आणि भारतीय पिकलबॉल संघटना यांच्या पाठिंब्याने ही कामगिरी बजावणाऱ्या अर्जुन व आदित्य सिंग यांनी जागतिक पिकल बॉल व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवताना भारतात भारतातील सर्वोत्तम गुणवान पिकलबॉल खेळाडू असल्याचे दाखवून दिले आहे. ही जोडी आता महाराष्ट्र पिकल बॉल संघटना व भारतीय पिकल बॉल संघटना आयोजित महाराष्ट्र ओपन २०२६ पिकलबॉल स्पर्धेत सहभागी होत आहे.
या यशाबद्दल बोलताना आदित्य सिंग म्हणाला की, अर्जुन आणि मी आम्ही दोघांनी या स्पर्धेसाठी अतिशय कठोर परिश्रम घेतले होते आणि त्यामुळे मिळालेले यश ते समाधानकारकच आहे. राहुल कनाल आणि महाराष्ट्र पिकल बॉल संघटना यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हाच आमच्यासाठी प्रेरणादायक ठरला. त्यांच्या पाठिंब्या शिवाय हे यश मिळवणे शक्य नव्हते
स्पर्धेत पुरुषांच्या ५.० दुहेरी गटात आदित्य व अर्जुन सिंग यांनी रायडर ब्राऊन व सोली मेसेरी यांचा ११-०१, ११-०५ असा पराभव करून सुवर्णपदकांची कमाई केली.
१८ वर्षाखालील मुलांच्या दुहेरीतही आदित्य व अर्जुन सिंग यांनी जॉय मोइदी व रिकी लिन या अव्वल मानांकित जोडीला ०९-११, ११-०२, ११-०७ असे पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर पुरुषांच्या ५.० एकेरीत अर्जुन सिंग याने एष्टन पीटरसनचा १३-११, ११-०६ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.
युएस ओपन पिकलबॉल स्पर्धेत अर्जुन व आदित्य सिंग यांना तीन सुवर्णपदके
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
35
°
C
35
°
33.9
°
52 %
7.2kmh
0 %
Thu
34
°
Fri
31
°
Sat
31
°
Sun
31
°
Mon
29
°

