Homeकला - क्रीडाउद्यापासून सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार

उद्यापासून सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार

कोल्हापूर :
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ या जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ४ ते १५ एप्रिल या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा होणार असल्याची माहिती पाटाकडील तालीम मंडळचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे व स्पर्धा समिती प्रमुख संदीप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूंना व त्यांच्या खेळाला प्रोत्साहन देणे हा आहे. ही स्पर्धा कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या मान्यतेने होत आहे. तसेच स्पर्धा कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे पंच स्पर्धा कालावधीत काम करणार आहेत. स्पर्धा बाद पध्दतीने खेळली जाईल.
स्पर्धेतील विजेत्या संघास रोख २ लाख रुपये व सतेज चषक तर उपविजेत्या संघाला रोख १ लाख रुपये व सतेज चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक, बचावपटू, मध्यफळीतील उत्कृष्ठ खेळाडू व आघाडी फळीतील उत्कृष्ठ खेळाडू यांना प्रत्येकी रुपये १५ हजारांची भेट वस्तू देण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीर तसेच रोजच्या सामन्यातील ‘सामनावीर’साठी भेटवस्तू व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला बाळासाहेब निचिते, श्रीनिवास जाधव, शरद माळी, दीपक चोरगे, बाळासाहेब चौगुले, गणेश  विचारे, कमलेश शिंदे, यश सरनाईक, सिध्देश हावळ आदी उपस्थित होते

RELATED ARTICLES
Mumbai
haze
27 ° C
27 °
27 °
74 %
2.1kmh
20 %
Fri
27 °
Sat
28 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page