कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या संकेत व्यवहारे याने पॉवरलिफ्टिंगमध्ये तर केदार शिंदे याने बॉडीबिल्डिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय येथे कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषद अंतर्गत शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये महाविद्यालयाच्या तृतीय वर्षातील कॉम्पुटर सायन्सचा संकेत व्यवहारे याने पॉवरलिफ्टिंग या स्पर्धेमध्ये ९३ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीमध्ये शिकत असलेला केदार शिंदे याने बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. संकेत व केदार यांना जिमखाना प्रमुख व्ही. बी. उतळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर यांनी संकेत व केदार यांचे अभिनंदन केले
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या संकेत व केदारचे क्रीडा स्पर्धेत यश
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
6 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

