कोल्हापूर :
के.एम.टी. उपक्रमाचा ६४वा वर्धापन दिन बुधवारी उत्साहात साजरा झाला. वर्धापनदिनानिमित्त के.एम.टी.च्या शास्त्रीनगर येथील यंत्रशाळेमध्ये महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी यंत्रशाळा परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या के.एम.टी. उपक्रमाचे संस्थापक कै. श्रीपतराव बोंद्रे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव आणि महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापक के. मंजूलक्ष्मी यांनी के.एम.टी. कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, उप सभापती दिपा ठाणेकर, परिवहन समिती सदस्य मानसी लोळगे, उमेश पोवार, महेंद्र कोरडे, प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये, रोहन अतिग्रे, श्रीधर गाडगीळ, अक्षय शेळके, नगरसेवक स्वरुप कदम, माधुरी व्हटकर, पूजा पोवार, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, मुख्य लेखापाल, को.म.न.पा. तथा अति.परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, वर्क्स मॅनेजर रणधीर मोरे, लेखापाल राजेंद्र सुर्यवंशी, कामगार व जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार, अंतर्गत लेखापरिक्षक दिनेश सोमण, खरेदी व भांडार अधिकारी संजय जाधव, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, सहा.अभियंता सुरेश पाटील, कसुरी विभाग प्रमुख प्रदिप म्हेतर, आस्थापना अधिक्षक सौ.वानू साबळे, वाहतूक निरिक्षक नितीन पोवार, सागर वंजारे, विवेक साठे, मारुती पाटील, हेमंत हेडाऊ, माजी वाहतूक निरिक्षक सुनिल जाधव तसेच के.एम.टी. सर्व विभागांकडील अधिकारी व कर्मचारी तसेच सुसंस्कार हायस्कूल कदमवाडीचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर के.एम.टी. उपक्रमाच्या शाहू क्लॉथ मार्केट येथील प्रधान कार्यालयातील कै. श्रीपतराव बोंद्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
——————————
केएमटीचा ६४वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Mumbai
haze
27
°
C
27
°
27
°
69 %
3.6kmh
20 %
Wed
27
°
Thu
28
°
Fri
27
°
Sat
28
°
Sun
27
°

