• खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर :
खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची भेट घेतली. संपूर्ण देशभर शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर केला जातो. अशावेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर असलेला जीएसटी रद्द व्हावा, या मागणीचे निवेदन खासदार महाडिक यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिले.
मुळात ट्रॉलीला कोणतेही इंजिन असत नाही. ट्रॅक्टरला जोडल्यानंतरच ट्रॉली किंवा ट्रेलरची वाहतुक होते. हायड्रोलिक यंत्रणा असलेले डंपींग ट्रेलरही ट्रॅक्टर मार्फतच ओढले जातात. सर्वच प्रकारच्या कृषी उत्पादनांची आणि त्यातही प्रामुख्याने ऊसाची वाहतुक करण्यासाठी या ट्रॉली किंवा ट्रेलरचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांसाठी ट्रॅक्टर ट्रॉली वाहतुक महत्वाची असते.
या ट्रॉलीवर जीएसटी आकारणी केल्याने कृषी उत्पादनांच्या किंमतीवर परिणाम होतो. सध्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ५ टक्के जीएसटी असून, हा करही केंद्र सरकारने रद्द करावा आणि शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. त्याला नामदार सितारमन यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.
——————————
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा
Mumbai
haze
28
°
C
28
°
28
°
78 %
3.6kmh
40 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
28
°

