कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने सहकार समृद्धी पुरस्कार सोहळा आणि कार्यशाळा ३ एप्रिल रोजी होणार आहे. कोल्हापुरातील आनंद भवन, सायबर कॉलेज सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा, संचालक जवाहर छाबडा, सागर चौगुले, अनिल पाटील, शंकर पाटील आदी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे. सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या, तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या यशस्वी महिलांच्या सन्मानाचा हा भव्य सोहळा असणार आहे. ३ एप्रिल रोजी कोल्हापुरात सहकार सम्राज्ञी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यातून सहकार चळवळीत कार्यरत असलेल्या महिलांना, प्रोत्साहन देण्यासह, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होणार आहे.
सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी दिला जाणारा हा किताब, नक्कीच महिलांच्या गुणवत्तापूर्वक कार्याचा उचित सन्मान असेल. या अंतर्गत बेस्ट चेअरमन, बेस्ट सीईओ, बेस्ट विशेष विक्री अधिकारी असे पुरस्कार प्रदान केले जातील. सहकार साम्राज्ञी किताबा अंतर्गत प्रथम क्रमांकासाठी २१००० रुपये आणि प्रमाणपत्र तर द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांक विजेत्या महिलेला ११ हजार रुपये आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, महापौर सौ. रुपाराणी निकम यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमात पुरस्कार प्रदान सोहळ्यासह एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. सकाळी १० वाजता उदघाटन होईल. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने सहकार कायद्यातील अपेक्षित बदल या विषयावर विशेष चर्चासत्र होणार आहे. त्याच्या बरोबरीने व्यवसायासाठी निधी कसा उभारावा, प्रभावी मार्केटिंग कसे करावे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा, गुणवत्ता राखून पॅकेजिंग किंवा जाहिरात कशी करावी अशा विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी अशाप्रकारचे प्रशिक्षण शिबिर आणि पुरस्कार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केले आहेत. यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून, ७८८८२८१२५१ किंवा ९८२२२६९८१३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्फत करण्यात आले आहे.
कोल्हापूरात ३ एप्रिलला सहकार समृद्धी पुरस्कार सोहळा आणि कार्यशाळा
Mumbai
moderate rain
27.9
°
C
27.9
°
27.9
°
82 %
5.4kmh
98 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
29
°

