Homeशैक्षणिक - उद्योग नाबार्डच्या चीफ जनरल मॅनेजर रश्मी दरद यांची केडीसीसी बँकेला भेट

नाबार्डच्या चीफ जनरल मॅनेजर रश्मी दरद यांची केडीसीसी बँकेला भेट

कोल्हापूर :
नाबार्डच्या महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाच्या चीफ जनरल मॅनेजर श्रीमती रश्मी दरद यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) च्या केंद्र कार्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी केडीसीसी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत महिला बचत गटांना धनादेशांचेही वाटप केले. बँकेने समाजातील छोट्या- छोट्या घटकांना केलेल्या अर्थपुरवठ्याचे त्यांनी कौतुक केले.
श्रीमती रश्मी दरद यांच्या समवेत नाबार्डच्या पुणेच्या जनरल मॅनेजर श्रीमती स्मृती भगत, असिस्टंट मॅनेजर श्रीमती अनन्या एम., कोल्हापूरचे जिल्हा प्रबंधक आशुतोष जाधव आदी अधिकारीही उपस्थित होते. बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या हस्ते पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी श्रीमती रश्मी दरद म्हणाल्या की, सुरू असलेले वर्षे हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. त्यामुळे केडीसीसी बँकेने काही विशेष योजना आखून महिला शेतकऱ्यांसाठी वेगळे काम करावे. गावागावातील प्राथमिक विकास सेवा संस्थांनी निव्वळ पीक कर्ज वाटपावरच न थांबता इतर व्यवसायही करावेत.
या बैठकीत प्रताप उर्फ भैया माने यांनी नाबार्डकडून अपेक्षा व्यक्त केलेले मुद्दे असे, देशात आणि परदेशात शिक्षणासाठी सुरू असलेल्या शैक्षणिक कर्ज योजनेचा व्याजदर कमी असावा. पॅक्स टू मॅक्स धोरणांतर्गत बंद पडलेली योजना नव्याने आणून संस्था सक्षमीकरणाचा प्रयत्न व्हावा. कोल्हापूर जिल्ह्यातील अपात्र कर्जमाफी प्रकरणी नाबार्डने शेतकऱ्यांप्रती सहानुभूतीची भूमिका घ्यावी.
केडीसीसी बँकेच्या कामकाजाचा आढावा संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी सविस्तर मांडला. बँकेच्या तांत्रिक वाटचालीची माहिती आय. टी. विभागाचे रवी बाबर यांनी सविस्तर मांडली.
स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. स्वाती कुंभार यांनी केले. अकाउंट्‍स बँकिंग विभागाचे व्यवस्थापक एस. एस. काकडे यांनी आभार मानले. यावेळी बँकेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
         ————-
सहकारांतर्गत सहकार….
श्रीमती रश्मी दरद म्हणाल्या की, सहकार हे सर्वांगीण विकासाचे मूलभूत क्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकारातील संस्था तसेच सहकार वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्वच घटकांना प्रोत्साहन देऊन “सहकारांतर्गत सहकार” हे अभियान ताकतीने पुढे न्यावे. यामुळे कोल्हापूर जिल्हा हा या चळवळीचे एक वेगळे आणि आदर्श मॉडेल ठरू शकेल.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
32 ° C
32 °
31.9 °
70 %
5.7kmh
40 %
Mon
31 °
Tue
31 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

You cannot copy content of this page