Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि जागतिक स्तरावरील अग्रगण्य असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी नवे दालन खुले होईल, असा विश्वास कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या सामंजस्य करारामध्ये संयुक्त प्रकल्प, सहकार्यात्मक संशोधन, शैक्षणिक व वैज्ञानिक उपक्रम, ड्यूअल डिग्री प्रोग्राम्स, ‘सेमिस्टर अब्रॉड’, इंटिग्रेटेड लर्निंग, इन्क्युबेशन व स्टार्टअप हब्स, विद्यार्थी व प्राध्यापकांची देवाणघेवाण तसेच शैक्षणिक साहित्य व प्रकाशनांची देवाणघेवाण यांचा समावेश आहे. ‘हँड्स-ऑन’ शिक्षण, एकात्मिक शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव, आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप व स्टडी टूर यावर विशेष भर दिला जाणार आहे.
जगातिक विद्यापीठांच्या यादीत ३३व्या क्रमांकावर असलेल्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीमध्ये आर्किटेक्चर, बिझनेस, डिझाइन इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रोबोटिक्स, मीडिया कम्युनिकेशन आणि प्रोसेसिंग इंजिनिअरिंग यांसारख्या विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. डी. वाय. पाटील ग्रुपच्या विद्यार्थ्याना या करारामुळे जागतिक संधी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, रजिस्ट्रार डॉ. जयेन्द्र खोत त्याचबरोबर प्रा. अ‍ॅना डेलेटिक, प्रा. दीपक दुबल, प्रा. शिमुल हक, प्रा. अजय पांडे, असोसिएट प्रा. इंदिरा प्रसादम, प्रा. आशीष भास्कर, डॉ. मुरली भूपती, डॉ. संग्राम पाटील, डॉ. शिवानंद शिरकोळे, डॉ. जयदीप पाटील, डॉ. उत्कर्ष आवळेकर, डॉ. सदाशिव कल्याण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी डी. वाय. पाटील समूहाच्या शैक्षणिक प्रवासाचा व शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा आणि विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली. प्रा. अ‍ॅना डेलेटिक व प्रा. दीपक दुबल यांनी क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीबाबात माहिती सादर केली. डॉ. जयेन्द्र ए. खोत यांनी आभार मानले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र -कुलपती ऋतुराज संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29 ° C
29 °
28.9 °
74 %
3.6kmh
2 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page