Homeकला - क्रीडापाटाकडील अंतिम फेरीत

पाटाकडील अंतिम फेरीत

• यजमान बालगोपालचे आव्हान संपुष्टात
कोल्हापूर :
अमीन खझीरने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळने बालगोपाल तालीम मंडळवर २-० गोलने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवामुळे यजमान बालगोपालचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दोन गोल केलेल्या अमीन खझीरला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. रविवारी (दि.२९) दुपारी चार वाजता खंडोबा तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल.
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. शुक्रवारी पाटाकडील आणि बालगोपाल संघादरम्यान सामना झाला. पूर्वार्धात पाटाकडीलकडून झालेल्या चढाईत गोलक्षेत्रात मिळालेल्या चेंडूला अमीन खझीरने गोलजाळ्याच्या दिशेने मारला. यावेळी बचावपटू महम्मद मुस्तफा फरासने चेंडूला बाहेर काढण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला अन् चेंडू गोलजाळ्यात गेला. अशाप्रकारे ५व्या मिनिटालाच पहिला गोल फलकावर झळकला. यानंतर गोलची आघाडी वाढवण्यासाठी पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे-पाटील, अमीन खझीर, ओमकार मोरे, यशराज कांबळे, रोमारिओ यांनी खोलवर चढाया केल्या, पण गोल करण्यात यश आले नाही. बालगोपालकडून ऋतुराज पाटील, अभिनव साळोखे, देवराज मंडलिक, रोहित कुरणे, के. लालरिनफेला , वैभव देसाई यांनी वेगवान चाली रचल्या परंतु समन्वयाचा अभाव आणि दिशाहीन फटाक्यांमुळे त्या वाया गेल्या.
उत्तरार्धात पावसाचा जोर वाढल्याने मैदान ओलसर झाले. निसरडेपणामुळे चेंडू मारताना तसेच वेगवान खेळ करताना खेळाडूंना मर्यादा आल्या. एका चढाईत ऋषिकेश मेथे-पाटीलने दिलेल्या पासवर अमीन खझीरने हेडव्दारा गोल नोंदविला. ५७व्या मिनिटाला आघाडी २-० अशी झाली.
यानंतर बालगोपालच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचल्या. त्यामध्ये ऋतुराज पाटील, वैभव देसाई, के. लालरिनफेला, अभिनव साळोखे यांना मिळालेल्या संधीचा लाभ उठवता आला नाही. पाटाकडीलचा गोलरक्षक अमर गवळीने उत्कृष्ट गोलरक्षण करत काही चढाया तत्परतेने परतावून लावल्या. गोलची आघाडी वाढवण्यासाठी पाटाकडीलच्या ओमकार मोरे, ऋषिकेश मेथे-पाटील, अमीन खझीर यांनी अटोकाट प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. अखेर उर्वरित वेळेत २-०ची आघाडी राखत विजयावर शिक्कामोर्तब करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
30 °
54 %
2.6kmh
20 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °

Most Popular

You cannot copy content of this page