कोल्हापूर :
महावितरण कंपनीतर्फे ३३ के.व्ही. लाईनच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवारी (दि.३०) हाती घेण्यात येणार आहे. यादिवशी विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील ए, बी, ,सी डी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवारी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच मंगळवारी (दि.३१) होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.
यामध्ये ए, बी, सी, डी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व शहरी अंतर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग. संपूर्ण सी, डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिध्दार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब. ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी ५, ६, ७ व ८वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागांचा समावेश आहे.
तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
——————————
महावितरणच्या ३३ के.व्ही. लाईनच्या दुरुस्ती कामामुळे सोमवारी पाणीपुरवठा बंद
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

