• अलियांझ जियो रिइन्श्युरन्सला आयआरडीएआयची मंजुरी
कोल्हापूर :
जियो फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अलियांझ समूहाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या अलियांझ जियो पुनर्विमा लिमिटेडने भारतात आपले कामकाज सुरू केले आहे. कंपनीला भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) कडून १२ मार्च २०२६ ला अंतिम नियामक मंजुरी मिळाली.
मुंबईस्थित हा संयुक्त उपक्रम जियो फायनान्शियलची मजबूत स्थानिक पोहोच आणि डिजिटल जाळे यांना अलियांझच्या जागतिक जोखीम मूल्यमापन कौशल्याची जोड देत विमा कंपन्यांना अधिक सक्षम जोखीम व्यवस्थापन सेवा उपलब्ध करून देणार आहे.
जियो फायनान्शियलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश सेठिया यांनी सांगितले की, अलियांझसोबतच्या व्यापक विमा भागीदारीच्या दिशेने हा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. अलियांझचे संचालक मंडळ सदस्य क्रिस टाउनसेंड यांनी म्हटले की, हा संयुक्त उपक्रम भारताच्या विमा क्षेत्रासाठी दीर्घकालीन पुनर्विमा उपाय विकसित करेल.
कंपनीचे नेतृत्व सोनिया रावल यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यांची अलियांझ जियो पुनर्विमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी विमा’ २०४७ या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर पुनर्विमा क्षमता वाढवणे हे क्षेत्राच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
जियो फायनान्शियल-अलियांझ रिइन्शुरन्स संयुक्त उपक्रमाचा भारतात व्यवसाय प्रारंभ
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
29.1
°
C
29.1
°
29.1
°
71 %
3.4kmh
66 %
Mon
29
°
Tue
30
°
Wed
30
°
Thu
31
°
Fri
31
°

