कोल्हापूर :
अभिनव साळोखेने उत्तरार्धात नोंदवलेल्या एकमेव गोलच्या जोरावर यजमान बालगोपाल तालीम मंडळने सम्राटनगर स्पोर्ट्सवर मात केली. यासह बालगोपालने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. विजयी गोल नोंदवणारा अभिनव साळोखे सामनावीर ठरला.
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. मंगळवारी बालगोपाल आणि सम्राटनगर संघादरम्यान सामना झाला. दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या पण गोलची नोंद झाली नाही. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी वेगवान खेळ झाला. बालगोपालच्या अभिनव साळोखेने दिलेल्या पासवर देवराज मंडलिकने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी हुकली. त्यानंतर के. लालरिनफेला याने डी टॉपवरून मारलेला चेंडू गोलपोस्टजवळून गेला. यानंतर झालेल्या चढाईत रोहित कुरणेच्या पासवर अभिनव साळोखेने ४८व्या मिनिटाला महत्वपूर्ण गोल करून संघाला आघाडीवर नेले. बदली खेळाडू प्रणव गायकवाडने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टच्यावरुन गेला. बालगोपालकडून ऋतुराज पाटील, रोहित कुरणे, वैभव देसाई, विराज पाटील, देवराज मंडलिक यांनी चांगला खेळ केला.
सम्राटनगरकडून कार्तिक जाधवने गोलची सोपी संधी दवडली. सोहम साळोखेने मारलेल्या फटक्यावर चेंडू बालगोपालचा गोलरक्षक माजिद अहमदने पंच करून बाहेर काढत गोलची संधी फोल ठरवली. त्यांच्या निरंजन कामते, अभिषेक सिंग, असिल बागवान यांनी केलेल्या चढाया समन्वयाअभावी वाया गेल्या. गोलची परतफेड करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. अखेर उर्वरित वेळेत १-०ची आघाडी कायम राखून बालगोपालने सामना जिंकला.
——————————
• पाटाकडील – प्रॅक्टीस क्लब : दुपारी ४ वा.
यजमान बालगोपालचा उपांत्य फेरीत प्रवेश
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
35
°
C
35
°
31.9
°
46 %
4.6kmh
0 %
Thu
33
°
Fri
31
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°

