• परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.बागवान, उपसभापतीपदी सौ. ठाणेकर
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी विशाल किरण शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित चंद्रकांत जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. कौसर इस्माईल बागवान, तर उप-सभापतीपदी सौ. दिपा अजित ठाणेकर यांची निवड करण्यात आली.
महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. स्थायी समिती सभापतीपदासाठी नगरसेवक विशाल शिराळे व अमर प्रणव समर्थ यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी दिलेल्या १५ मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर स्थायी समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये किरण शिराळे यांना ९ मते तर अमर समर्थ ७ मते पडली. किरण शिराळे यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली.
परिवहन समिती सभापतीपदासाठी नगरसेवक सत्यजित चंद्रकात जाधव व दुर्वास परशुराम कदम यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर परिवहन समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सत्यजित जाधव यांना ८ मते तर दुर्वास कदम यांना ५ मते पडली. सत्यजित जाधव यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची परिवहन समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन परिवहन समिती सभापती हे प्रभाग क्र.११ – क या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी नगरसेविका सौ. कौसर इस्माइल बागवान व सौ. जयश्री धनाजी कांबळे यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ. कौसर बागवान यांना ५ मते तर सौ. जयश्री कांबळे यांना ४ मते पडली. सौ. कौसर बागवान यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली.
महिला व बालकल्याण समिती उप-सभापतीपदासाठी नगरसेविका सौ. दिपा अजित ठाणेकर व सौ. अरुणा विशाल गवळी यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ. दिपा ठाणेकर यांना ५ मते तर सौ. अरुणा गवळी यांना ४ मते पडली. सौ. दिपा ठाणेकर यांना सर्वाधिक ५ मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पीठासन अधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अधिकारी, नगरसेवक व नगरसेविका यांनी नुतन स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. विजय पाटील, परवाना अधिक्षक अशोक यादव, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी उपस्थित होते.
——————————
कोल्हापूर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे
Mumbai
overcast clouds
29.7
°
C
29.7
°
29.7
°
71 %
3.8kmh
100 %
Sat
31
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
29
°

