कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजमधील हर्षवर्धन हरिश्चंद्र पाटील या विद्यार्थ्यांने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात ३४९वी रँक मिळवून यश संपादन केले.
हर्षवर्धन पाटीलने आपले प्राथमिक शिक्षण श्रीराम हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण केआयटी कॉलेजमध्ये पूर्ण केले. हर्षवर्धनचे वडील प्रा. डॉ. हरिश्चंद्र पाटील हे विवेकानंद कॉलेजमधून भूगोल विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते विवेकानंद कॉलेजच्या पदव्युत्तर भूमाहितीशास्त्र विभागाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
हर्षवर्धन पाटील यांच्या या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, प्रबंधक एस. के. धनवडे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवकवर्ग यांनी अभिनंदन केले.
विवेकानंदचा हर्षवर्धन पाटील केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत ३४९व्या रँकने उत्तीर्ण
RELATED ARTICLES
Mumbai
haze
30
°
C
30
°
30
°
74 %
3.6kmh
40 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
30
°

