Homeशैक्षणिक - उद्योग संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर :
नवी दिल्ली येथे मनीष मिडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘द ज्वेलस ऑफ इंडिया – भारत की शान, भारत का अभिमान’ पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा हॉटेल द अशोका येथे मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय कर्तृत्व, उद्योजकता आणि राष्ट्रीय अभिमान यांचा गौरव करणारा हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा होता. या सोहळ्यात संजय घोडावत समूहाचे संस्थापक व अध्यक्ष संजय दानचंदजी घोडावत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
द ज्वेल्स ऑफ इंडिया हा पुरस्कार यावेळी संजय घोडावत यांना प्राप्त झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींचा परिचय असणाऱ्या “मास्टर इन द आर्ट ऑफ स्टिम्युलस, रिस्पॉन्स अँड ग्रोथ” या पुस्तकात संजय घोडावत यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा समावेश करण्यात आला असून, भारतीय उद्योजकतेचे ज्वलंत उदाहरण म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
संजय घोडावत यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल उद्योग व शिक्षण क्षेत्रात सर्वच ठिकाणी त्यांचे कौतुक होत आहे व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.6 ° C
25.6 °
25.6 °
68 %
2.9kmh
8 %
Wed
27 °
Thu
26 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °

Most Popular

You cannot copy content of this page