कोल्हापूर :
मातृभाषेत जेवढे व्यक्त होता येते तेवढे दुसऱ्या भाषेमध्ये व्यक्त होता येत नाही. मातृभाषेच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाचन व लेखन करणे गरजेचे आहे. मातृभाषेच्या विकासाचे बाळकडू शैक्षणिक प्रक्रियेमध्ये विकसित होते. विविध छंद जोपासल्याने जीवनात सर्जनशीलतेला व सृजनशीलतेला वाव मिळतो. साहित्याकडे डोळसपणे पाहण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द लेखक व समिक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी केले.
ते विवेकानंद महाविद्यालयातील वाड्.मय मंडळ व आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाचव्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकांनद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे हे होते. प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात व डॉ. श्रुती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षीय मनोगतात कौस्तुभ गावडे यांनी, धावपळीच्या जीवनात आयुष्याला उभं करण्यासाठी माणूस सतत संघर्ष करीत आहे. हा संघर्ष साहित्यातून चित्रित होत असतो. त्यासाठी युवकांच्या साहित्यप्रज्ञेचा शोध घेण्यासाठी आणि नवोदितांच्या सर्जनशीलतेला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी अशा युवा साहित्य संमेलनांची आवश्यकता असते, नव्या पिढीचे साहित्य विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. आजच्या आधुनिक प्रसारमाध्यमांमुळे साहित्याची व आपली नाळ तुटत आहे. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता नष्ट होत आहे. असेच सुरु राहिले तर आपल्यातील संवेदनशीलता संपून जाईल. त्यामुळे साहित्याच्या वाचनाने व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास करावा, असे प्रतिपादन केले.
संमेलनाच्या प्रथम सत्रात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक किरण गुरव यांची प्रकट मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली. दुसऱ्या सत्रात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवा कवी संमेलन झाले. या संमेलनामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या कविता सादर केल्या. तसेच महाविद्यालयातील प्रा. सतीश उपळावीकर, डॉ. कैलास पाटील, डॉ. इरफान मुजावर यांनी आपल्या कविता सादर केल्या.
संमेलनाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे समाधी परिसर ते ग्रंथालय या मार्गावरील ग्रंथदिंडीने टाळ व मृदुंगाच्या गजरात झाली. प्रास्ताविक संमेलनाचे समन्वयक डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले. यावेळी स्वागताध्यक्ष विद्यार्थी प्रतिनिधी कु. श्रावणी पाटील हिने मनोगत व्यक्त केले. आभार डॉ. प्रदीप पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील, प्रा. अविनाश गायकवाड व डॉ. एस. एस. अंकुशराव यांनी केले.
या संमेलनाच्या आयोजनासाठी डॉ. कविता तिवडे, डॉ. दीपक तुपे, डॉ. एस. आर. कट्टीमनी, डॉ. नीता पाटील, हितेंद्र साळुंखे, डॉ. शुभांगी काळे, प्रा. एच. व्ही. चामे, डॉ. ए. एस. महात, प्रा. अश्विनी खवळे, प्रा. सनी काळे, डॉ. स्नेहा देसाई, प्रा. रोहिणी रेळेकर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांचे सहकार्य लाभले.
साहित्याकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता : प्रा. रणधीर शिंदे
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.6
°
C
25.6
°
25.6
°
68 %
2.9kmh
8 %
Wed
27
°
Thu
26
°
Fri
25
°
Sat
25
°
Sun
25
°

