• संयुक्त डवरी समाज, यादवनगर संघ उपविजेता
कोल्हापूर :
पाटाकडील तालीम मंडळ पुरस्कृत खण बॉईज आयोजित सत्यजित चषक २०२६ फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात पुणे येथील बादशहा एफसी संघाने संयुक्त डवरी समाज, यादवनगर फुटबॉल संघाचा ट्रायब्रेकरवर पराभव करून सत्यजित चषक पटकावला. संयुक्त डवरी समाज, यादवनगर संघ उपविजेता ठरला.
विजेत्या बादशहा एफसी, पुणे संघाला ५५ हजार रुपये आणि चषक तर उपविजेत्या संयुक्त डवरी समाज, यादवनगर संघाला २१ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या या टर्फ स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला. टिकी टाका टर्फ येथे स्पर्धा झाली. स्पर्धेतील अंतिम सामन्याची सुरुवात शिवसेनेच्या उपनेत्या, माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, उपमहापौर अक्षय जरग, अश्किन आजरेकर, ओंकार जाधव, सयाजी साळोखे, सुजय हिलगे यांच्या हस्ते झाली. अंतिम सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला. मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत असलेल्या सामन्यात बादशहा एफसी, पुणे संघाने ट्रायब्रेकरवर विजेतेपद पटकावले.
विजेत्या संघाला शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे समालोचन विजय साळोखे यांनी केले तर रोहन ठोंबरे यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खण बॉईजच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
पुण्याच्या बादशहा एफसी संघाने सत्यजित चषक पटकावला
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.8
°
C
25.8
°
25.8
°
67 %
5.5kmh
0 %
Tue
27
°
Wed
27
°
Thu
26
°
Fri
25
°
Sat
25
°

