Homeशैक्षणिक - उद्योग एमएसबीटीईचे सचिव मारुती जाधव यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान

एमएसबीटीईचे सचिव मारुती जाधव यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान

कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई) मुंबईचे सचिव व कासेगाव (ता. वाळवा)चे सुपुत्र मारुती शांताबाई राजाराम जाधव यांना शिवाजी विद्यापीठाकडून अणुविद्युत अभियांत्रिकी या विषयामध्ये पीएच.डी. ही मानाची पदवी प्राप्त झाली. ”डिझाईन ॲण्ड अनॅलिसीस ऑफ मिमो ॲंटिना फॉर व्हेईकल टू एव्हरिथिंग कम्युनिकेशन विथ रिड्युस्ड म्युच्युअल कपलिंग” हा त्यांचा पीएच.डी.चा मुख्य विषय होता.
डॉ. मारुती जाधव यांना त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक शिवाजी विद्यापीठाचे तंत्रज्ञान अधिविभागाचे प्राध्यापक डॉ. उत्तम बोंबले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्याचबरोबर डॉ. उदय पाटील, डॉ. महेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले. हे संशोधन त्यांनी नामांकित अशा आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये प्रसिद्ध केले आहे.
त्यांनी शालेय शिक्षण जि.प. शाळा व आझाद विद्यालय कासेगाव येथून तर अभियांत्रिकीचे शिक्षण राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर याठिकाणी पूर्ण केले. यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून आपले पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी काही काळ अध्यापनाचे कार्य देखील केले. डॉ.जाधव यांची लोकसेवा आयोगामार्फत सहायक संचालकपदी नियुक्ती झाली होती. नुकतीच त्यांची सचिव महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई या पदावर पदोन्नती झाली आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.8 ° C
25.8 °
25.8 °
67 %
5.5kmh
0 %
Tue
27 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
25 °
Sat
25 °

Most Popular

You cannot copy content of this page