Homeशैक्षणिक - उद्योग ‘गोकुळ’च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

‘गोकुळ’च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍यावतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालयात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महिला विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर यांनी केले. तर आभार जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी केले.
यावेळी संघाचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ संचालक अभिषेक डोंगळे, गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन व्‍यवस्‍थापक दत्तात्रय वागरे, डॉ. दयावर्धन कामत, डॉ. प्रकाश दळवी, डॉ. विजय मगरे, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे, गीता मोरे, संभाजी जाधव तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.4 ° C
28.4 °
28.4 °
82 %
8.3kmh
100 %
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page