Homeशैक्षणिक - उद्योग संजय घोडावत विद्यापीठाचा क्यू-स्पायडर्स, बंगळुरूसोबत शैक्षणिक व प्लेसमेंट करार

संजय घोडावत विद्यापीठाचा क्यू-स्पायडर्स, बंगळुरूसोबत शैक्षणिक व प्लेसमेंट करार

कोल्हापूर :
संजय घोडावत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बंगळुरू येथील नामांकित क्यू-स्पायडर्स  संस्थेसोबत शैक्षणिक व प्लेसमेंट भागीदारीचा सामंजस्य करार केला. क्यू-स्पायडर्ससोबत अशा प्रकारचा विशेष शैक्षणिक भागीदार करार करणारे संजय घोडावत विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरले आहे.
क्यू-स्पायडर्स ही २००३ साली स्थापन झालेली जागतिक स्तरावरील सॉफ्टवेअर व मॅनेजमेंट प्रशिक्षण संस्था असून तिचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेव्हलपमेंट आणि आयटी करिअर प्लेसमेंट क्षेत्रात विशेष प्रावीण्य असलेल्या या संस्थेने आतापर्यंत १५० हून अधिक केंद्रांद्वारे दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करण्यासाठी ही संस्था ‘फिनिशिंग स्कूल’ म्हणून कार्यरत आहे.
क्यू-स्पायडर्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश शिवन्ना यांनी विद्यापीठाला भेट देऊन बी.टेक., एमबीए (फिनटेक व डेटा अ‍ॅनालिटिक्स), एमसीए (फुलस्टॅक स्पेशलायझेशन) आणि बी.डिझाईन (यूआय/यूएक्स) या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक भागीदारीचा करार केला.
यावेळी गिरीश शिवन्ना म्हणाले की, या सहकार्यामुळे घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शैक्षणिक तज्ज्ञ व उद्योग क्षेत्रातील तज्ञांकडून प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. क्यू-स्पायडर्सच्या सक्षम प्लेसमेंट सेलद्वारे घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रात्यक्षिक व उद्योगाभिमुख असून पदवी पूर्ण होताच विद्यार्थी रोजगारासाठी सक्षम बनतील.
विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनिअर, ऑटोमेशन इंजिनिअर, मॅन्युअल टेस्टर, फुलस्टॅक डेव्हलपर, डेटा अ‍ॅनालिस्ट इत्यादी मागणी असलेल्या उद्योग क्षेत्रांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच उद्योगाशी निगडित प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी व कौशल्याधारित विकासाला चालना मिळणार आहे.
विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत हे उद्योगसज्ज अभियंते व व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक घडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी या उपक्रमाबाबत व करारबाबत सकारात्मक भूमिका घेतली. विश्वस्त व गव्हर्निंग बॉडी सदस्य विनायक भोसले यांनी या सहकार्याच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. कुलगुरू प्रा. डॉ उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार यशस्वी झाला असून विद्यापीठाच्या वतीने रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27 ° C
27 °
27 °
54 %
1.5kmh
100 %
Thu
27 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page