Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांची निवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांची निवड

 

आयआयटी व एनआयटीमध्ये इंटर्नशिपसाठी निवड

कोल्हापूर :
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागाच्या १३ विद्यार्थ्यांची देशातील नामांकित आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयटी व एनआयटीमध्ये संशोधन इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देशातील अग्रगण्य संशोधक व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागातील प्रशांत सुरेश शिरगावे, सानिया संभाजी कोंडकर व सानिका संभाजी अरगुलकर या तीन विद्यार्थ्यांची आयआयटी, हैदराबाद येथे सहा महिन्यांच्या संशोधन इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. ही इंटर्नशिप मशीन लर्निंग क्षेत्रातील असून विद्यार्थ्यांना प्रगत तांत्रिक संकल्पनांवर प्रत्यक्ष संशोधन करण्याचा अनुभव मिळणार आहे.
ऋषिकेश सुतार व प्रणाली पाटील या दोन विद्यार्थ्यांची आय.आय.टी., भुवनेश्वर येथे मशीन लर्निंग व डीप लर्निंग क्षेत्रातील संशोधन इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. याआधी त्यांची एन.आय.टी. सुरतकल, एन.आय.टी. गोवा आणि आय.आय.टी. इंदूर या संस्थांमध्ये निवड झाली होती. मात्र संशोधनाच्या दृष्टीने अधिक अनुकूल संधी असल्याने त्यांनी आय.आय.टी. भुवनेश्वरची निवड केली.
अभिषेक पाटील, राजवर्धन ढेंगे, सुयश वरेकर, साईप्रसाद लेंदळे व हृषिकेश जगताप या पाच विद्यार्थ्यांची एन.आय.टी. गोवा येथे डीप नेटवर्क्स आणि डिजिटल हार्डवेअर डिझाइन या क्षेत्रातील संशोधन इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. हे संशोधन डॉ. अमोल डी. राहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
देवराज माने व कृतिका़ कांबळे या दोन विद्यार्थ्यांची आय.आय.टी. मुंबई येथे प्रा. सोहम मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना संशोधन कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची तसेच प्रगत तांत्रिक संकल्पनांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे.
तसेच अंतिम वर्षांत शिकणारा आणि सलग तीन वर्षं सौ. शांतादेवी डी. पाटील शिष्यवृत्ती मिळवणारा टॉपर अभिषेक श्रीशैल स्वामी याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, नवी दिल्ली (अकॅडेमिकअँड ट्रेनिंग डिपार्टमेंट) येथे संशोधन इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. प्रयोगशाळा कार्य, जीन विश्लेषण, पेशी संस्कृती, रोगप्रतिकारक चाचण्या आणि संगणकीय डेटाचे विश्लेषण याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून आधुनिक जैविक संशोधनाची प्रॅक्टिकल ओळख, संशोधन कौशल्ये, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळेल.
या यशाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, प्राचार्य डॉ. संतोष चेडे तसेच विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.6kmh
35 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page