कोल्हापूर :
प्रतिभावान, उमलत्या, युवा कलाकारांना सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी एनसीपीए मुंबई, गायन समाज देवल क्लब आणि सिटी बँक यांच्या सहसंयोजनाने विशेष सायंकालीन संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या संगीत सभेत आदित्य मोडक (पुणे) यांचा शास्त्रीय गायनाविष्कार आणि पं. राजेंद्र कुलकर्णी (पुणे) यांचे बासरीवादन शनिवार दि. ७ फेब्रुवारी २०२६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता संस्थेच्या बाळासाहेब घाटगे दालनामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
आदित्य मोडक यांचे संगीताचे सुरुवातीचे शिक्षण प्रदीप धोंड यांच्याकडे झाले. सध्या ते पं. राम देशपांडे यांच्याकडे गायनाची तालीम घेत आहेत. आकाशवाणीचे ए ग्रेड कलाकार असलेल्या आदित्य यांना पंचाक्षरी गवई पुरस्कार, पं. राम मराठे पुरस्कार, चतुरंग फाउंडेशन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांनी डॉ. वसंतराव देशपांडे समारोह, काशी संगीत समाज महोत्सव, ग्वाल्हेर संगीत महोत्सव अशा विविध ठिकाणी गायनाविष्कार सादर केला आहे. त्यांना तबला व संवादिनीची पूरक साथ स्वप्नील भिसे आणि स्वरूप दिवाण करीत आहेत.
कार्यक्रमच्या दुसऱ्या सत्रात पं. राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरीवादन सादर होईल. वयाच्या ६ व्या वर्षापासून बासरीचे शिक्षण वडिल पं. बाळासाहेब कुलकर्णी यांच्याकडे. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याचे गायक आणि संगीत विद्वान पंडित नारायणराव विनायकराव पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले. भारतातील प्रमुख शहरांमधील जसे दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, नागपूर, पणजी, धारवाड, बेळगांवसह अनेक शहरांमध्ये विविध मोठ्या संगीत संमेलनात बासरीवादन आणि श्रोते आणि संगीत समिक्षकांची प्रशंसा लाभली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांचा संगीत अलंकार भारतात प्रथम क्रमांकासह. १९८१ मध्ये ‘सूरमणी’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना तबला साथ शंतनू देशमुख करीत आहेत. सर्वांसाठी विनामूल्य असणाऱ्या या संगीतसभेचा लाभ संगीतप्रेमी रसिकांनी घेण्याचे आवाहन श्रीकांत डिग्रजकर यांनी केले आहे.
——————————
देवल क्लबतर्फे सायंकालीन संगीत सभेचे आयोजन
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
34
°
C
34
°
31.9
°
43 %
5.7kmh
40 %
Tue
32
°
Wed
29
°
Thu
30
°
Fri
30
°
Sat
28
°

