Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत विद्यापीठात भूगोल दिन साजरा

घोडावत विद्यापीठात भूगोल दिन साजरा

कोल्हापूर :
विद्यार्थ्यांना स्थानिक भूगोलाची शास्त्रीय समज, नकाशावाचन कौशल्य आणि ग्रामीण विकासाबाबतची जाणीव वाढीस लागावी या हेतूने १४ जानेवारी भूगोल दिनाचे औचित्य साधून संजय घोडावत विद्यापीठात नुकताच भूगोल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भूगोल विभागाच्यावतीने ‘माय व्हिलेज माय मॅप’ स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. उद्धव भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील, मानवविद्या व सामाजिक शास्त्र संकुलाचे अधिष्ठाता डॉ. उत्तम जाधव, भूगोल विभागप्रमुख डॉ. कपिल पाटील, प्रा. विशाल जाधव, प्रा. गोपाळ पाटील उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. आज्ञा मांजरेकर व प्रा. अंबपकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचा भौगोलिक नकाशा, नैसर्गिक संसाधने, लोकवस्ती, वाहतूक, जलस्रोत तसेच विकासाच्या संधी व समस्या यांचे पोस्टरद्वारे प्रभावी सादरीकरण केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नकाशा मांडणी, विषयाची स्पष्टता व सादरीकरण कौशल्य यांचे विशेष कौतुक केले.
यासाठी विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूगोल विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.2 ° C
28.2 °
28.2 °
82 %
9.7kmh
100 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page