Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजमध्ये भारतीय प्रजासत्ताक  दिन उत्साहात साजरा

विवेकानंद कॉलेजमध्ये भारतीय प्रजासत्ताक  दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेजमध्ये ७७वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी शानदार परेड संचलन व प्रात्यक्षिके सादर केली.
याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, संस्था परिसरातील डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरींग कॉलेज, डॉ. बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या तसेच पीएच.डी. पदवी प्राप्त  केलेल्या, सेट नेट परीक्षा उत्तीर्ण व पुस्तक लेखक, प्रकाशक, पेटंट प्राप्त प्राध्यापक या गुणवंत प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती प्रा. विश्वंभर कुलकर्णी, सदानंद दुर्गुळे यांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. कविता तिवडे यांनी मानले.
विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना विभाग प्रमुख प्रा. डॉ. विकास जाधव, कॅप्टन सुनिता भोसले, लेफ्टनंट जे. आर. भरमगोंडा, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, रजिस्ट्रार सचिन धनवडे व प्रशासकीय कर्मचारी यांनी केले.
या प्रसंगी संस्था परिसरातील डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरींग कॉलेज, डॉ. बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील, प्रा. समीक्षा फराकटे यांनी केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28.9 °
28 °
78 %
5.1kmh
41 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page