कोल्हापूर :
विद्यार्थ्यांना शेतमालाची खरेदी विक्री, व्यवहार, लिलाव पध्दती, बाजार समिती प्रणाली समजून घेण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयातील अर्थशास्त्र व कॉमर्स विभागातील ५० विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीस शैक्षणिक भेट दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शेतमालाची खरेदी विक्री, व्यवहार, लिलाव पध्दती, बाजार समितीच्या प्रणालीमध्ये शेतकरी, अडते, व्यापारी यांची भूमिका समजून घेतली. तसेच या भेटीअंतर्गत ई नाम योजने अंतर्गत केंद्र शासनाने ई ऑक्शन प्रणाली अंतर्गत कृषी विपणन, राष्ट्रीय बाजार योजना व समितीचे भावी प्रकल्प, गुळ बाजार इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी बाजारसमितीचे उपसचिव वसंत पाटील व योगेश खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप पाटील यांनी केले. आभार प्रा. डॉ. कैलास पाटील यांनी मानले. या भेटीचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र व कॉमर्स विभागाच्यावतीने प्रा. सनी काळे डॉ. संदीप पाटील, प्रा. ए. बी. वसेकर, प्रा. ओंकार कुलकर्णी, रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांनी केले होते.
——————————
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीस भेट
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31
°
C
31
°
29.9
°
66 %
3.1kmh
12 %
Wed
30
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

