• आतापर्यंत १३६ हून अधिक रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया
कोल्हापूर :
येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई च्या सहकार्याने आयोजित केलल्या मणका तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १२ व १३ जून रोजी झालेल्या या विशेष शिबिरामध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १३६ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती ‘स्पाईन फाऊंडेशन’चे प्रमुख डॉ. शेखर भोजराज, हॉस्पिटलचे अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. प्रदीप पाटील, अस्थिरोग तज्ञ डॉ. सलीम लाड यानी दिली.
डॉ. लाड म्हणाले, डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ‘द स्पाईन फाऊंडेशन’च्या सहकार्याने मणक्याच्या आजारांवरील विशेष ओपीडी गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक गरीब रुग्णाची यामध्ये तपासणी करण्यात आली आहे. यातील गंभीर आजार असलेल्या १३६ रूग्णांवर आतापर्यंत मणक्याच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, द स्पाईन फाऊंडेशन मुंबई सहकार्याने मोफत स्पाईन सर्जरी करणारे डी. वाय. पाटील हॉस्पीटल हे गडचिरोलीनंतर देशातील दुसरे मोठे सेंटर बनले आहे.
गेल्या दोन दिवसात १२ रुग्णांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हे रुग्ण कोल्हापूर जिल्हा, सांगली, मिरज, सिंधुदुर्ग, निपाणी या भागातील आहेत. यातील ६ रुग्णांवर यापूर्वी अन्य हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. मात्र त्यांना पुन्हा त्रास होत असल्याने त्यांच्यावर नव्याने शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये जन्मत:च कुबड असलेली १४ वर्षांची मुलगी, मानेचे मज्जारज्जू दबलेले ८६ वर्षांचे वृद्ध, मज्जारज्जू दबल्याने हातची हालचाल करू न शकणारे रुग्ण अशा लोकांवर या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. खासगी रुग्णालयांमध्ये ज्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, त्या शस्त्रक्रिया या उपक्रमांतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आल्या.
डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, मणक्याच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचार, एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आता कोल्हापूरमध्येच डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. हॉस्पिटलमध्ये दर शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत स्पाईन ओपीडी सुरू असून राज्याच्या विविध भागांतील रुग्ण येथे तपासणीसाठी येत आहेत.
‘द स्पाईन फाऊंडेशन’चे प्रमुख आणि ख्यातनाम स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. यावेळी भूलतज्ञ डॉ. संदीप कदम, डॉ. ऋषीकेश मेहता, डॉ. भूषण पाटील, डॉ. मंदार बोर्डे, डॉ. सुरज देशमुख, डॉ. ऋषीकेश पाटील आदींनी या शस्त्रक्रिया केल्या.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरु डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने जास्तीत जास्त रुग्णापर्यंत हि सेवा पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. अमोल गोवइकर, डॉ. उमेश जैन, डॉ. सिद्धार्थ निगडे, डॉ. जय भोसले यांनी सांगितले.
——————————
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया
Mumbai
light rain
31
°
C
31
°
29.9
°
70 %
5.1kmh
7 %
Fri
31
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

