Homeकला - क्रीडाशुक्रवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘घबाडकुंड' 

शुक्रवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘घबाडकुंड’ 

कोल्हापूर :
नावातच गूढता दडलेली ‘घबाडकुंड’ ही कलाकृती थरार, रहस्य आणि भीतीचा अनोखा खेळ घेऊन येत आहे. एक भव्य आणि रहस्यमय ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. या अभिनव संकल्पनेला ‘आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ लाभली आहे. ‘घबाडकुंड’ हा चित्रपट शुक्रवारी (दि.१९) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आयुष्यात अनपेक्षित घटनांनी काहींच्या स्वप्नांना पंख फुटतात, पण त्याचवेळी पडद्यामागे सुरू असतो संशय आणि संकटांचा भयानक खेळ. भीती आणि अनिश्चिततेच्या छायेत घडणाऱ्या अकल्पित घटनांमुळे कथानक प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न उभे करते. सत्याच्या शोधात निघालेल्यांना कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागते? आणि शेवटी नशीब जिंकतं की माणूस? याची उत्कंठा वाढविणारा ‘घबाडकुंड’ हा चित्रपट १९ जूनपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे.
शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदि कलाकार ‘घबाडकुंड’ चित्रपटात आहेत.
दिग्दर्शकाने कथानकाची मांडणी अत्यंत प्रभावी पद्धतीने करत प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. उत्कृष्ट छायांकन, पार्श्वसंगीत आणि दमदार अभिनय यामुळे ‘घबाडकुंड’चा अनुभव अधिक रोमांचक होणार आहे. थरार आणि रहस्य आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘घबाडकुंड’ ही एक पर्वणी ठरणार आहे. हा चित्रपट मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. गीतकार नयूम पठाण आहेत. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी बॅकग्राउंड म्युझिकची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
81 %
7kmh
78 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page