कोल्हापूर :
विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा व सायबर क्राईम याविषयी जागृत करण्यासाठी विवेकानंद कॉलेजमधील वाणिज्य विभाग व व्यक्तिमत्व विकास कक्ष यांच्यामार्फत ग्राहक जागरुकता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सायबर क्राईमसंदर्भात समाजात जागृती निर्माण करून देश सेवा करावी असे प्रतिपादन सायबर क्राईम शाखा, कोल्हापूरचे ए. एस. आय. सागर माळवे यांनी केले. त्यांनी सायबर सुरक्षिततेची गरज, सायबर गुन्ह्याचे प्रकार, सायबर गुन्हेवारीवरील प्रतिबंध उपाय व माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक संरक्षण कायद्यातील बदल व या कायद्यातील तरतुदींचा आपल्या दैनदिन जीवनामध्ये कसा वापर करावा याविषयी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर महानगरचे उपाध्यक्ष सुहास गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर महानगरचे अध्यक्ष विनायक वाळवेकर यांनी जागृत ग्राहकासाठीच्या प्रतिज्ञेचे वाचन करून घेतले.
याप्रसंगी प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सनी काळे यांनी केले. आभार डॉ. यु. डी. दबडे यांनी मानले. या उपक्रमासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात व आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. ए. एल. मोहिते, डॉ. वाय. बी. माने, प्रा. एस. एन. चव्हाण, प्रा. ओ. पी. कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
——————————
विवेकानंद कॉलेजमध्ये ग्राहक जागरुकता उपक्रम
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.2
°
C
27.2
°
27.2
°
81 %
13kmh
100 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°

