Homeराजकियखा. शाहू छत्रपती व आ. सतेज पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक

खा. शाहू छत्रपती व आ. सतेज पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक

कोल्हापूर :
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी यांचा यात समावेश आहे.
या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक, खा. रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान, खा. प्रणिती शिंदे, आ. डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, आ. अमित देशमुख, ॲड. के. सी. पाडवी, खा. वर्षा गायकवाड, आ. अस्लम शेख, आ. डॉ. विश्वजित कदम, एम. एम. शेख, मुजफ्फर हुसेन, रणजित कांबळे, माजी मंत्री रमेश बागवे, राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप, आ. साजीद खान पठाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत पुरके, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे अध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख आदींचा या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
28 %
4.1kmh
0 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page