• दुहेरीत स्वानिका रॉय व सन्मिथा लोकेश, तर रिभव सारोहा व शिवतेज शिरफुले यांना विजेतेपद
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना (केडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०व्या रमेश देसाई मेमोरियल नॅशनल ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात कर्नाटकच्या स्निग्धा कांता हिने, तर मुलांच्या गटात तेलंगणाच्या हृतिक कटकम याने विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत मुलींच्या गटात स्वानिका रॉय व सन्मिथा लोकेश यांनी, तर मुलांच्या गटात रिभव सारोहा व शिवतेज शिरफुले यांनी विजेतेपद पटकावले.
येथील केडीएलटीए टेनिस संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये एकेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात अव्वल मानांकित कर्नाटकच्या स्निग्धा कांताने दहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या स्वानिका रॉयचा ४-६, ६-०, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
मुलांच्या गटात तेलंगणाच्या हृतिक कटकमने चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफुलेचा ६-४, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित चंदीगढच्या रिभव सारोहा याने महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफुलेच्या साथीत अव्वल मानांकित तेलंगणच्या हृतिक कटकम व आंध्रप्रदेशच्या लक्ष्य चुक्काचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या स्वानिका रॉयने सन्मिथा लोकेशच्या साथीत तेलंगणाच्या झोहा कुरेशी व तमिळनाडूच्या नलयाझीयनी के या जोडीचा ६-०, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण केडीएलटीएचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश कित्तुर, केडीएलटीएचे सचिव मेघन बागवडे, शेखर शिंदे, भरत पाटील, समिती सदस्य एस. एस. मोमीन आणि स्पर्धा संचालक शितल भोसले, मुरलीधर घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा निरीक्षक सेजल केनिया आदी मान्यवर उपस्थित होते.
——————————————————-
राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत स्निग्धाकांता व हृतिक कटकम यांना विजेतेपद
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.1
°
C
30.1
°
30.1
°
73 %
5.8kmh
14 %
Mon
30
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

