• ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर
कोल्हापूर :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) तर्फे आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने साधलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले. या सुवर्ण यशामध्ये महाराष्ट्राची कन्या स्मृती मंधना हिने बजावलेली भूमिका उल्लेखनीय ठरली. तिच्या या असामान्य कामगिरीच्या गौरवार्थ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)तर्फे स्मृती मंधनाला ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करून सन्मानित करण्यात आले.
स्मृती मंधनाने संपूर्ण स्पर्धेत उच्च दर्जाची व सातत्यपूर्ण फलंदाजी करत ५४.२५ सरासरीने ४३४ धावा नोंदवून विश्वचषकातील दुसरी सर्वोच्च धावा करणारी खेळाडू म्हणून स्थान मिळवले. न्यूझीलंड विरुद्ध लीग सामन्यात खेचलेले शतक आणि मिळवलेला सामनावीर पुरस्कार भारताच्या विजयी मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरला.
याप्रसंगी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, भारतीय महिला क्रिकेट संघाने केलेली विलक्षण कामगिरी ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. स्मृती मंधनाची सातत्य, निर्धार आणि सामनावीर प्रदर्शन ही भारताच्या विश्वविजयात मोलाची ठरली. तिचा गौरव म्हणून ५० लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तिने पुढील पिढ्यांसाठी नवे आदर्श आणि मानदंड निर्माण केले आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजय शिर्के यांनीही शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला अधिवक्ता कमलेश पिसाळ, संतोष बोबडे, संजय बजाज तसेच एमसीएच्या सर्व मान्यवर एपेक्स कौन्सिल सदस्यांची उपस्थिती होती.
एमसीएतर्फे स्मृती मंधनाचा गौरव
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
34
°
C
34
°
30.9
°
31 %
4.6kmh
36 %
Tue
32
°
Wed
29
°
Thu
30
°
Fri
30
°
Sat
28
°

