कोल्हापूर :
पुना क्लब लिमिटेड आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (पीजीटीआय) यांच्यावतीने संयुक्तपणे आयोजित दुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर दोन फटक्यांनी पिछाडीवर असलेल्या शौर्य भट्टाचार्यने अखेरच्या दिवशी आपला सर्वोत्तम खेळ करताना चुरशीच्या प्ले ऑफमध्ये युवराज संधूला पराभूत करून विजेतेपद संपादन केले.
पूना क्लबच्या गोल्फ कोर्सवर सुरु असलेल्या या स्पर्धेत आधीच्या तीन फेऱ्यांमध्ये ६९, ६३ व ६७ अशी कामगिरी करणाऱ्या शौर्यने अखेरच्या फेरीत ७ अंडर ६४ अशी दिवसातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना एकूण २१ अंडर २६३ अशा कामगिरीसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अखेरच्या क्षणी झालेल्या प्ले ऑफमध्ये बर्डीची नोंद करताना शौर्य याने युवराज संधुचे आव्हान मोडून काढले. शौर्यचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे व एकूण तिसरे विजेतेपद ठरले. त्याला १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच, त्याने पीजीटीआय मानांकन यादीतदेखील चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. त्याची या मोसमातील एकूण कमाई ८३,०२,३९२ रुपये इतकी झाली.
युवराज संधूनेही एकूण २१अंडर २६३ अशी कामगिरी नोंदवताना अखेरच्या फेरीत ६६ गुणांची नोंद केली. मात्र, प्ले ऑफमध्ये त्याला ॲट पार या निकषावर पराभव पत्करावा लागला. उपविजेत्या युवराज संधूला १० लाख रुपये असे पारितोषिक देण्यात आले. या मौसमातील त्याची एकूण कमाई ९८,६७,२०० व रुपये इतकी झाली. वीर अहलावत आणि शिवेंद्र सिंग शिसोदिया या आव्हानविरांना १२ अंडर २७२ अशा निराशाजनक कामगिरीसह संयुक्त तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुण्याच्या रोहन ढोले पाटील याने स्थानिक खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कामगिरी करताना एकूण ६ अंडर २७८ अशा आकडेवारीसह चौदावा क्रमांक निश्चित केला.
——————————————————-
ओपन गोल्फ स्पर्धेत शौर्य भट्टाचार्य याला विजेतेपद
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
79 %
7.9kmh
15 %
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°
Sat
28
°

