• एकरकमी विनाकपात रुपये ३४०० देणार : गणपतराव पाटील
कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ५४व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते सकाळी ११:४५ वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन देशातील विविध ठिकाणी असलेल्या ऊस दराची माहिती दिली. सदरचे दर पहाता आपल्या जिल्ह्यातील ऊसाचे दर हे सर्वात जास्त आहेत. केंद्र शासनाने एफआरपी रकमेमध्ये प्रतिवर्षी वाढ केली आहे. परंतु सन २०२१ मध्ये जाहीर केलेली प्रती क्विंटल रुपये ३१०० या एमएसपी दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे सर्व साखर कारखानदारांना ऊसाची एफआरपी रक्कम देणे अत्यंत जिकीरीचे होत असल्याचे सांगितले. हा सिझन कारखान्याच्या दृष्टीने महत्वाचा असून आपण सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस आपल्याच कारखान्याला पाठवून द्यावा अशी विनंती केली.
यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडीत गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. केंद्र शासनाने प्रतीवर्षी जाहीर केलेली एफआरपी रक्कम एकरकमी आदा केली आहे. दत्त कारखाना हा आपलाच कारखाना आहे. आम्ही विश्वस्त म्हणून या ठिकाणी काम करीत आहोत. सभासदांचे एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याने मेळावे घेवून सभासदांना मार्गदर्शन केले आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी आम्ही ऊस विकासाच्या विविध योजना राबवून शास्त्रज्ञांच्यामार्फत सातत्याने सभासदांना मार्गदर्शन केले आहे. सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल. या हंगामासाठी एकरकमी प्रतिटन रुपये ३४०० इतकी विनाकपात देणार आहोत. तसेच हंगाम समाप्तीनंतर जी रिकव्हरी येईल त्याप्रमाणे शासन धोरणाप्रमाणे रक्कम द्यावी लागल्यास तीही कारखाना सत्वर देईल. या हंगामात कारखान्याने १५ लाख मे. टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून सर्व सभासद बंधंनी सहकार्य करावे.
यानंतर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा यांनी, आमच्या कारखान्याची ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवली असून सर्व सभासदांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली व सर्व उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, संचालक बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, बसगोंडा पाटील, ॲड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू गोपाळ माने-गावडे, जोतीकुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, विजय सुर्यवंशी, महेंद्र बागे, संचालिका सौ. संगीता पाटील-कोथळीकर, सौ. अस्मिता पाटील, बाळासाहेब पाटील-हालसवडे, मलकारी तेरदाळे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मेस्त्री, कामगार संचालक प्रदिप बनगे यांचेसह ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील व त्यांचे सर्व सहकारी आदींसह कामगार युनियनचे पदाधिकारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद बंधू, कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-
श्री दत्त साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

